Thursday, April 30, 2026
Latest NewsPUNE

पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्क (एसटीपी) उभारणार ३ नवे सेंटर ऑफ एक्सलन्स

पुणे :  पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्कतर्फे (एसटीपी)  नजीकच्या भविष्यात ३ नवे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु करण्यात येणार आहेत. यासंबंधीची घोषणा एसटीपीला ४० पूर्ण झाल्यानिमित्ताने रविवारी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. यामध्ये यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन इनोव्हेशन अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट, सेंटर ऑफ एक्सलन्स इन पॉलिसी रिसर्च,  सेंटर ऑफ एक्सलन्स इन जिओइन्फॉरमॅटीक्स व ग्लोबल केपेबिलीटी सेंटरचा समावेश आहे. कार्यक्रमात एसटीपीच्या  चार दशकांच्या नवोन्मेषी उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन देखील करण्यात आले.

यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पदमश्री आशुतोष शर्मा,  एसटीपी चे  महासंचालक राजेंद्र जगदाळे, अध्यक्ष  दिलीप बंड, सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आणि पार्कचे उपाध्यक्ष  प्रताप पवार,  अजय श्रीवास्तव, नलिन कोहली,  अनिता गुप्ता,  अशोक सराफ,  अनिल वाली,   दीपनविता चट्टोपाध्याय, प्रसाद मेनन, अनिल हटकर, सुजित बॅनर्जी, एस. एम. करूपणचेट्टी , प्रणय गुप्ता, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

एसटीपीच्या गेल्या ४ दशकातील कामगिरीचा आढावा घेनता डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले की, आजवर एसटीपीने तब्बल १३७२ स्टार्टअपना इनक्युबेशनची सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर २६० स्टार्टअपना रुपये १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतचे फंडिंग मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे हे फंडिंग वाया गेले नाही. संबंधित स्टार्टअप आपापल्या कामात पुढे गेल्या. एसटीपीच्या माध्यमातून देशातल्या सर्व राज्यांमध्ये आजवर विविध क्षेत्रातील ऐकूण ६५९ प्रकल्प पूर्ण करण्यात आले. तसेच २६ नाविन्यपूर्ण उत्पादने एसटीपीच्या माध्यमातून विकसित करून त्यांना बाजारपेठेपर्यंत नेण्यात यश मिळवले असल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.

गेल्या ४० वर्षांपासून  आपण या संस्थेच्या बरोबर जोडले गेलो आहोत. इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संस्था सातत्याने काम करत आहे. भविष्य काळात नवीन उद्योजकांना, तज्ज्ञ मंडळी, यांना मदत करण्यासाठी इथे सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्कतर्फे नाविन्यता आणि तंत्रज्ञानामधील सेंटर ऑफ एक्सलन्स उभे करण्यात येणार असल्याचे  बौद्धिक स्वामित्व सल्लागार ऍडव्होकेट राघवेंद्र पोंक्षे यांनी यावेळी सांगितले. नव्याने होणाऱ्या संशोधनाच्या बरोबरच भारतमधील तंत्रज्ञानाला बळकटी देण्याचं काम त्यामुळे शक्य होणार आहे. नव्या पिढीच्या तरुण मंडळींना त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्क हा भारत आणि जग यामधील उत्तम  सेतू आहे या ठिकाणी अनेक विषयावर काम झालेले आहे. स्टार्टअप कंपन्यांना याठिकाणी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात नवी गुंतवणूक येत आहे, त्यामुळे इथे नव्या संशोधनासाठी खूप संधी उपलब्ध असल्याचे योगेश पवार यावेळी म्हणाले.

स्टार्टअपसाठी धोरण संशोधन ही एक महत्त्वाची चळवळ  असल्याचे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पदमश्री आशुतोष शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले. उत्तम प्रकारचे ज्ञान मिळवले की त्यामधून पैसे येतात त्यामुळे आपण त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या एआयचा जमाना आहे, त्यामुळे आपण नवीन ज्ञान घेत असतानाच बदल स्वीकारण्याची  देखील आवश्यकता आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्कने केलेल्या कामाचा त्यांनी यावेळी गौरव केला.  या कार्यक्रमामध्ये विदेशातून  व्हिडिओ कॉलद्वारे सेलिना हुआंग (अध्यक्ष, एएबीआय) डॉ. वादिम कोटेलनिकोव्ह (रशिया, संस्थापक, इनोम्पिक्स, माजी संचालक, एपीसीटीटी) यांनी सायन्स अँड टेकनॉलॉजी पार्क बद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदीश पाटणकर यांनी केले. डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading