Wednesday, April 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

मराठी रंगभूमीला माझ्या मनात आदराचे स्थान – राकेश बेदी

पुणे : मराठी रंगभूमीला माझ्या मनात खूप आदराचे स्थान आहे. मराठी रंगभूमीच्या परीसंस्थेला माझा सलाम आहे, आणि हे मी अगदी मनापासून बोलतो आहे असे मत प्रसिद्ध नाट्य, दूरचित्रवाणी व धुरंधर फेम चित्रपट अभिनेते राकेश बेदी यांनी व्यक्त केले. बोरा मल्टीकॉर्पच्या ओटेक या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते, तेंव्हा ते बोलत होते. यावेळी ओटेकचे प्रशांत बोरा, रितेश ब्रह्मेचा व मनीष जैन उपस्थित होते. नगर रस्त्यावरील  हयात हॉटेल मध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला.

बेदी म्हणाले, “मराठी रंगभूमीत उत्तम नाटककार आहेत. मी स्वतः गेली कित्येक वर्ष विजय तेंडूलकर लिखित ‘मसाज’ नावाचे एकपात्री नाटक करतो आहे. मराठी प्रेक्षकांना नाटक आवडल्यास ते कधी, कुठे आणि किती वाजता आहे याची पर्वा करत नाहीत, आवर्जून नाटक पाहायला येतात. चांगल्या नाटकांना असलेला मराठी प्रेक्षकांचा हा पाठींबा मराठी रंगभूमीवर नवनवे प्रयोग करण्यास प्रोत्साहित करतो आणि त्यामुळेच मराठी रंगभूमी समृद्ध आहे.”

“मी एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचा विद्यार्थी असल्याने माझे पुण्याशी विशेष नाते आहे. पण पुणे शहराविषयी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे माझी पत्नी पुण्याची आहे. मला पुणे शहर खूप आवडते व मला इथला मिसळ पाव खायला आवडतो”, असे बेदी यांनी नमूद केले.

धुरंधरच्या याश्विषयी बोलताना बेदी म्हाणाले की, धुरंधर सारख्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटाला एका वेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेवून ठेवले आहे. विषय, तंत्रज्ञान, विषयाची मांडणी या सर्वच पातळीवर नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांचे काम आणखी आव्हानत्मक असेल.

तंत्रज्ञाणामुळे होणारे बदल आपणा स्वीकारायला हवेत पण आपण हे बदल कोणत्या प्रकारे स्वीकारतो हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे होणारा बदल आपल्यावर हावी नाहीयेत न याची काळजी घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे जग वायरलेस होत चालले आहे पण मनाचे तार मात्र कमकुवत होता चालले आहेत अशी खंत बेदी यांनी यावेळी व्यक्त केली. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या बाबीवर अत्यंत उच्च दर्जा असलेला धुरंधर बघितल्यावर आपण सोबत घेवून जातो ते म्हणजे या चित्रपटातील इमोशन्स असा मुद्दा बेदी यांनी यावेळी मांडला.

प्रत्येक कलाकाराला काही काळानंतर स्वतःचा नव्याने शोध घ्यावा लागतो असे सांगत बेदी म्हणाले कितीही यश मिळाले तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. धुरंधरच्या यशामुळे माझ्या कामाची मला माझ्या कामाची, चांगल्या अभिनयाची पावती मिळाली असे बोलले जाते. त्यावर मला असे वाटते की, मला माझ्या कामाची पावती प्रेक्षकांकडून याधीही मिळाली आहे. परतू आता सोशल मीडियामुळे त्याची व्याप्ती कळते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading