एसएमएफजी इंडिया क्रेडिटला विकासाला गती देण्यासाठी सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप कडून प्राप्त झाली 1,075 कोटी रु. ची गुंतवणूक
मुंबई : भारतीय बाजार आणि कंपनीच्या विकास धोरणाप्रती असलेली दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ करत सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप (एसएमएफजी) ने एसएमएफजी इंडिया क्रेडिट (SMICC) मध्ये राइट्स इश्यूद्वारे 1,075 कोटी रु. ची गुंतवणूक केली आहे.
एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवि नारायणन म्हणाले, “एसएमएफजी कडून मिळालेली ही भांडवली गुंतवणूक आम्ही पुढील वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत असताना आमच्या धोरण आणि अंमलबजावणीच्या सामर्थ्याला अधिक बळ देते. उत्कृष्ट अंमलबजावणी आणि लवचिकता याद्वारे शाश्वत, अंदाजयोग्य आणि अस्थिरता नसलेली अशी वाढ साध्य करण्यावर आमचा भर कायम आहे. नवीन युगातील तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आमच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाला गती देत, ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी निष्पक्ष, पारदर्शक पद्धतींप्रती आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आणि प्रशासन, अनुपालन व जोखीम व्यवस्थापनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत आम्ही आमचे बाजारपेठेतील स्थान अधिक मजबूत करण्यास आणि आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी सज्ज आहोत.”
एसएमआयसीसीची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) 31 डिसेंबर 2025 रोजी 64,100 कोटी रु. इतकी होती. त्यात वार्षिक 21% वाढ दिसून आली. एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीतील वितरण 39,500 कोटी रु. होते. त्यात वार्षिक 29% वाढ नोंदवली गेली आहे.
