Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मनसेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरेंबाबद प्रश्न विचारताच अजय शिंदे भडकले 

पुणे : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ मे पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. दरम्यान उद्या (दि.16) हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात येत आहेत. त्यावर मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांना पत्रकारांनी विचारले वसंत मोरे हे उद्याचा कार्यक्रमाला येणार आहेत का. त्यावर अजय शिंदे भडकले भडकले. अन् म्हणाले, मी त्याचे उत्तर देइला बांधील नाही. ज्यांना कार्यक्रमाला यायचयं ते येऊ शकतात. मी फक्त कार्यक्रमाची माहिती देण्याचे काम केले आहे’. त्यामुळे मनसेतील गटबाजी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे.

अजय शिंदे म्हणाले, ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकरला 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा होणार आहे. उद्या सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे.

दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत. सुमारे २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्यांचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे,. राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेत, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading