रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण : चित्रा वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार – पीडित तरुणी

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने बलात्कार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता. यामुळे मागील दोन महिन्यापासून पुण्यासह राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. मात्र काही दिवसांपूर्वी पीडितेने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दबाव टाकल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याची वेळ आली पुणे पोलिसांवर आली आहे. त्यातच आज पुन्हा पीडितेने पत्रकार परिषद घेवून चित्रा वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. आहे.

ती म्हणाली, रघुनाथ कुचिक आणि माझ्यातील वाद मिटल्यास चित्रा वाघ यांच्यावर माझ्या भावनेचा आणि नात्याचा वापर करून बदनामी केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे”. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एक व्यक्ती असून त्याने आमच्यात वाद निर्माण केले आहेत. त्या व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करणार असल्याचे पीडितेने सांगितलं आहे.

पुढे बोलताना ती म्हणाली, रविवारपर्यंत मी कुचिक यांच्या प्रतिसादाची वाट बघणारआहे. जर त्यांनी मला योग्य प्रतिसाद दिला तर मी त्यांनतर केस मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेणार. तसेच चित्रा वाघ यांच्या विरोधात लवकर गुन्हा दाखल करणार असा इशारा या पीडित मुलीने चित्रा वाघ यांना दिला.

दरम्यान, रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात भाजपच्या नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत पीडितेची भूमिका मांडत होत्या. मात्र चित्रा वाघ यांनीच पीडितेला गोव्यात डांबून ठेवले होते असा आरोप पीडित तरुणीने चार दिवसापूर्वी केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पीडित तरुणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: