आधी अभ्यास करावा मगच संभाजी ब्रिगेडचं नाव घ्यावं – चंद्रशेखर घाडगे

पुणे:राज ठाकरे तुमचा अभ्यास कच्चा आहे.संभाजी ब्रिगेडचं नाव घेयच्या आधी अभ्यास करा. मग संभाजी ब्रिगेडचं नाव घ्या आणि शिवद्रोही पुरंदरेचं वाहवा करणं बंद करा.कारण शिवप्रेमींना माहीत आहे तो पुरंदरे शिवद्रोहीच होता पण तुम्हाला त्याचाच पुळका आहे,कारण तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचाराने नाहीतर पुरंदरेच्या विचाराने चालत आहात. अशी टीका संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी केली. 

संभाजी ब्रिगेड १९९५ साली पुरूषोत्तम खेडेकर साहेबांनी स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केली,महाराष्ट्र नवनिर्माण सेना २००६ साली राज ठाकरे यांनी स्थापन केली.


संभाजी ब्रिगेड राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारांवर काम करत आहे, म्हणून महाराष्ट्रात दंगली बंद झाल्या, महाराष्ट्राची सामाजिक शैक्षणिक प्रगती झाली, अंधश्रद्धेतून बहुजन समाज बाहेर पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रात मोठे काम केले आहे करत आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर आणला, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आणि इतर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन केले,

शिवद्रोही लोकांचे चेहरे जनतेसमोर आणले, संभाजी ब्रिगेड कळायला राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बी टिम तर कधी भारतीय जनता पक्षाची ढ टिम म्हणून काम करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या नावाने राजकारण करून परप्रांतीयांच्या अंगावर महाराष्ट्रातील मराठी मुलांना सोडले, टोल नाक्यावर तोडफोड करायला लावली, हजारो मराठी तरुणांवर गुन्हे दाखल झाले, त्याचा त्रास राज ठाकरेंना नाहीतर गुन्हे दाखल झालेल्या त्या मराठी तरुणांच्या आई वडीलांना झाला आहे, नवनिर्माण तर सोडाच कुणाच्या मागे जाऊ, मराठी मुद्दा घेऊन राजकारण करू का हिंदुत्ववादी मुद्दा घेऊन राजकारण करू, संभ्रमावस्थेत असलेल्या राज ठाकरे यांना कोणताही वैचारिक मुद्दा नसल्यामुळे महाराष्ट्रात कधी मनोरंजनाचं काम तर कधी दंगल भडकवण्याचे काम मनसे करत आहे, पैसे गोळा करून पक्ष चालवनाऱ्यानी संभाजी ब्रिगेड पक्षाच नाव घ्यायच्या आधी अभ्यास करावा मगच संभाजी ब्रिगेडचं नाव घ्यावं असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी राज ठाकरेंना दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: