इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात

जालना : आपल्या खास शैलीतील किर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला आहे. काल (दि.13) रात्री परतूर (जालना) तालुक्यातील खांडवीवाडी इथे हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये इंदोरीकर महाराज यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर (जालना) तालुक्यातील खांडवीवाडी इथे किर्तनासाठी जात असताना एका ट्रॅक्टरवर गाडी आदळून हा अपघात झाला. अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: