देशाची फाळणी होऊ द्यायची नसेल तर हिंदू सशक्त झाला पाहिजे – चंद्रकांत पाटील

पुणे : सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘पुढील १५ वर्षात अखंड भारत पहायला मिळेल’, असे वक्तव्य केल आहे. त्यावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘देश फाळणीच्या दिशेने चालला आहे’, अशी टीका केली आहे. यावर “देशाची फाळणी होऊ द्यायची नसेल तर हिंदू सशक्त झाला पाहिजे”, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील दिले आहे. 

ते आज पुण्यात पत्रकाराशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “देश काही फाळणीच्या दिशेनं चाललेला नाही. देश फाळणीच्या दिशेनं जाऊ द्यायचा नसेल तर हिंदू सशक्त झाला पाहिजे. हिंदू या शब्दामध्ये इतरांना सामावून घेणंच आहे. हिंदूंनी सदासर्वकाळ थप्पड खाणं म्हणजे देशातील वातावरण न बिघडवणं आहे का? अब हिंदू मार नहीं खाएगा हे तर आता गेल्या ५० वर्षांमध्ये पक्क झाल आहे. हे राष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या हिंदूराष्ट्रच आहे. हिंदूंनी मार खाणं म्हणजे मग फाळणी होणार नाही का? हिंदूंनी सशक्त होणं याच्यातून फाळणी वाचेल. कारण हिंदू शब्दामध्ये सर्वांना सामावून घेणं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काही न मानणारा सुद्धा हिंदू आहे 

शरद पवार नास्तिक आहेत की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. हिंदू हा शब्दच असा आहे की, कोणी गणपती मानतं, कोणी देवी मानतं, कोणी शंकर मानतं, कोणी काहीच मानत नाही. मुसलमानांच्या नमाज पठण करुन अल्लाह पर्यंत पोहोचण्याला आदर आहे. चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करुन येशुपर्यंत पोहोचण्याला देखील आदर आहे. हिंदू हा शब्दा सर्वधर्म समभाव आहे. तो पुजा, मुर्तीशी जोडलेला नाही. त्यामुळे काहीन मानणारा सुद्धा हिंदू, जो या देशावर प्रेम करतो.असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: