चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत द गेम चेंजर्स संघाला विजेतेपद

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय 
करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत देवदत्त नातू(2-25 व 44धावा) याने केलेल्या
 अष्टपैलू खेळीच्या जोरावरबद गेम चेंजर्स संघाने नाशिकच्या एनएसएफए संघाचा 3 गडी 
राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
 
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना एनएसएफए संघाच्या यश क्षीरसागर(2-6), प्रज्वल गुंड(2-15), देवदत्त नातू (2-25)यांच्या भेदक माऱ्यापुढे एनएसएफए नाशिक संघाचा डाव 19.5षटकात सर्वबाद 121धावावर संपुष्टात आला. यात तनय कुमार 20, हर्ष सांघवी 15, राहुल भोरे 12, ध्रुव सेन नाबाद 14 यांनी थोडासा प्रतिकार केला.
 
याच्या उत्तरात द गेम चेंजर्स संघाने हे आव्हान   13.4षटकात 7 गडी गमावून 124धावा करत पूर्ण केले. यात देवदत्त नातूने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल दखवत 31 चेंडूत 5चौकार व 3षटकाराच्या मदतीने 44धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला यश क्षीरसागर 20, रोहन दामले 20, प्रज्वल गुंड नाबाद 17, अतुल विटकर 10 यांनी धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणारा देवदत्त नातू सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेतील विजेत्या द गेम चेंजर्स संघाला करंडक व 51000रुपये, तर उपविजेत्या एनएसएफए संघाला करंडक व 41000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाशिक स्पोर्ट्स अँड फिटनेसचे संचालक शशांक जोशी आणि शिवाजी  डबडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा संचालक अभिषेक अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
निकाल: अंतिम फेरी: 
एनएसएफए नाशिक: 19.5षटकात सर्वबाद 121धावा(तनय कुमार 20(30,1×4), हर्ष सांघवी 15, राहुल भोरे 12, ध्रुव सेन नाबाद 14, यश क्षीरसागर 2-6, प्रज्वल गुंड 2-15, देवदत्त नातू 2-25) पराभूत वि.द गेम चेंजर्स:  13.4षटकात 7बाद 124धावा(देवदत्त नातू 44(31,5×4,3×6), यश क्षीरसागर 20, रोहन दामले 20, प्रज्वल गुंड नाबाद 17, अतुल विटकर 10, ध्रुव सेन 2-31, रोहित भोरे 1-9, विशाल मोहिते 1-23);सामनावीर-देवदत्त नातू; द गेम चेंजर्स संघ 3 गडी राखून विजयी;
 
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: तनय कुमार(180धावा,एनएसएफए);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: रोहित भोरे(12 विकेट, एनएसएफए);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: साकेत वरपे(7झेल, एनएसएफए);
मालिकावीर: देवदत्त नातू(215धावा व 7 विकेट, द गेम चेंजर्स).

Leave a Reply

%d bloggers like this: