सोलिस यानमार ट्रॅक्टर्सने दोन वर्षात देशात गाठला १३,००० ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा

पुणे : जगातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या सॉलिस यानमार  ट्रॅक्टरर्सने भारतीय बाजारपेठेत आपले उत्पादन सुरू केल्यानंतर केवळ दोन वर्षांतच १३,००० ट्रॅक्टर विक्रीचा ऐतिहासिक टप्पा कंपनीने  गाठला आहे.सॉलिस यानमार ग्राहकांच्या परिपूर्ण समाधानासाठी अग्रणी तंत्रज्ञान प्रदान करते. कठोरता, टिकाऊपणा तसेच कार्यक्षमतेचा समानार्थी म्हणजे सॉलिस यानमार. आजचा दिवस हे भविष्य आहे या भावनेतून सॉलिस यानमारने शेतकऱ्यांसाठी असाधारण दृष्टिकोन अवलंबून समोर ठेवून भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले होते.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडच्या फ्लॅगशिप ब्रँडने स्थापनेपासून १०० वर्षे पुढे राहण्यासाठी १०० वर्षांच्या जपानी तंत्रज्ञानाचे भांडवल करणे सुरूच ठेवले आहे.  तसेच प्रगत कृषी बाजारपेठेतील सर्वात कठीण क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवत आहे. सॉलिस यानमार हा७  युरोपीय देशांमध्ये नंबर १ ट्रॅक्टर ब्रँड आहे.ट्रॅक्टर उद्योगात ‘ग्लोबल 4 डब्ल्यूडी तज्ज्ञ’ (फोर व्हील ड्राईव्ह) म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करत सॉलिस यानमारने  प्रसिद्ध वायएम 3 ट्रॅक्टर श्रेणी सादर केली आहे . तसेच  २५० हून अधिक डीलरशिपपर्यंत  नेटवर्क मजबूत करत  भारतातील पहिले हायब्रीड ट्रॅक्टर आणि इतर अनेक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टर लाँच केले आहेत.

सॉलिस यानमारचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की गेल्या काही वर्षांतील आमच्या सर्व परिश्रमाने आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार केले. भारतीय बाजारपेठेत अवघ्या दोन वर्षात १३,००० ट्रॅक्टर आम्ही बाजारात आणले. यानमार सोबतचा आमचा संयुक्त उपक्रम फलदायी ठरत आहे. आम्ही जपानी तंत्रज्ञानाच्या १०० वर्षांच्या वारशाचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. पुढील १०० वर्षांसाठी आम्ही नवनवीन काम करत राहू.

आम्हाला खरोखर वाटते की ‘दुनिया है हमारी, अब भाई इंडिया की बारी’. सर्वोत्कृष्ट दर्जाचे उत्पादन आणि सेवा पुरविण्याची देशभरातील ही मोहीम आहे. आम्ही आधीच धोरणात्मक दिशा ठरवली आहे ज्याचे परिणाम दिसायला सुरवात झाली आहे.  नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना, ७ युरोपीय देश आणि जागतिक ४ डव्ब्लूडी ट्रॅक्टर श्रेणीमध्ये आमच्या मजबूत क्रमांक १ स्थानासह आम्ही भारतीय शेतकऱ्यांसाठी ‘फ्यूचर इज नाऊ’ याची खात्री देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: