Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

डॉ. पराग बिनीवाले यांची पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड

पुणे : शहरातील प्रसिद्ध प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पराग बिनीवाले यांची पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ १ वर्षाचा असेल. डॉ. बिनीवाले हे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. ते प्रसूती व स्त्रीरोग विषयातील तज्ञ असून १९९३ पासून वैद्यकीय सेवेत आहेत. त्यांनी यापूर्वी  संस्थेचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम केले आहे.

पुणे ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेची स्थापना सन १९५३  मध्ये झाली आणि आज संस्थेचे ८०० हून अधिक सदस्य आहेत. ही संस्था फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या शिखर संस्थेशी संलग्न आहे.

माझ्या कार्यकाळात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या वैद्यकीय समस्यांवर लक्ष केंद्रित करणार्‍या ‘हर लाईफ काउंटस्’ या संकल्पनेवर काम करण्यावर प्राधान्य असेल असे डॉ बिनीवाले म्हणाले.

संस्थेच्या २०२२-२३ या वर्षासाठीच्या कार्यकारीणीमध्ये निवड झालेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. मिलिंद दुगड (उपाध्यक्ष), डॉ. उमा वानखेडे (कार्यकारी उपाध्यक्ष), डॉ. आशिष काळे (सरचिटणीस), डॉ. चैतन्य गणपुले (खजिनदार), डॉ.मंजिरी वळसंगकर (क्लिनिकल सेक्रेटरी) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading