खोटे बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील केस मी मागे घेणार आहे. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कुठलाही दबाब नाही. माझ्यासोबत जे घडले आहे ते खरे आहे. मात्र मला, माझ्या कुटुंबीयांना धोका असल्यामुळे मी केस मागे घेत आहे. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केला आहे. तर चित्रा वाघ यांच्याविरोधात अद्याप तक्रार दिली नाही, असेही या तरुणीने म्हटले आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले, असे या तरुणीने चित्रा वाघ त्यांच्यावर खोटा आरोप केला होता. त्यामुळे काल पुण्यातील राजकारण चांगलेच तापले बघायला भेटले. चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस युवतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन केले.

या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवती कडून खोटे बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष सीमा सातपुते, मृणाल वाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस युवती च्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीमा सातपुते म्हणाल्या,अनेक राजकीय नेत्यांच्या विषयी आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचं, त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचं काम चित्रा वाघ करत आहेत. मदतीच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या करतात. प्रसिद्धीसाठी चित्रा वाघ स्टंट करतात. हे अतिशय भयंकर असून,
चित्रा वाघ यांच्या वागण्यामुळे महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल .राजकारणात अशा पद्धतीचे वर्तणूक, नेतागिरी त्यांनी करू नये अशीही विनंती यावेळी करण्यात आली. अजून किती मुलींच्या बाबतीत त्यांनी अशा पद्धतीची वर्तणूक केली आहे .याचा तपास करण्याची तक्रार पोलिसांकडे आणि महिला आयोगाकडे करणार असल्याचेही सीमा सातपुते म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: