Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्सने भारतीय सैन्याला अति उंचावरील क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरू शकणारी लढाऊ वाहने पोचती केली

मुंबई:टाटा ऍडवान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने (टीएएसएल) इन्फन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी वेहिकल्स (आयपीएमव्हीएस) चा पहिला ताफा आज पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात आर्मी स्टाफचे जनरलपीव्हीएसएमएव्हीएसएमएसएमव्हीएसएमएडीसी श्री. एम. एम. नरवणे यांना सुपूर्द केला. हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याने टीएएसएल ही भारतीय सैन्य दलासाठी व्हील्ड आर्मर्ड लढाईसाठी सज्ज वाहने बनवणारी व पोचती करणारी भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे. वाहनांचा पुरवठा करण्याबरोबरीनेच टीएएसएल वाहने जिथे तैनात करण्यात येतील तिथे त्यांच्या देखरेखीसाठी २४X७ साहाय्य देखील पुरवेल.  आयपीएमव्ही हा संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यासोबत चालवला जात असलेला सह-विकास प्रकल्प आहे.

यावेळी टीएएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  सुकरन सिंग यांनी सांगितले, “आयपीएमव्ही यशस्वीपणे पोचती करणे हा टीएएसएलसाठी आणि भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण इथूनच डीआरडीओ आणि एका खाजगी कंपनीने सह-विकसित केलेल्या एका धोरणात्मक प्लॅटफॉर्मची पहिली व्यापारी विक्री सुरु झाली आहे. महामारीमुळे उत्पन्न झालेली आव्हाने आणि त्यामुळे झालेले विलंब या सर्वांवर यशस्वी मात करत टीएएसएलने हा टप्पा पार केला आहे त्यामुळे यश आमच्यासाठी अजून जास्त मोलाचे व लक्षणीय ठरले आहे.”

आयपीएमव्ही टीएएसएलच्या पुण्यातील कारखान्यात विकसित व तयार करण्यात आली आहेत. या आयपीएमव्हीना टीएएसएल आणि डीआरडीओचे एक युनिट असलेल्या व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्हीआरडीई) यांनी स्ट्रॅटेजिक ८X८ व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्मवर (डब्ल्यूएचएपी) देशातच डिझाईन व विकसित केले आहे.  भारतीय सैन्याने या वाहनांच्या वाळवंटी प्रदेशात तसेच अति उंचीवरील भागांमध्ये अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या आहेत.  आयपीएमव्हीमध्ये डीआरडीओच्या डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीने विकसित केलेले एक्स्टर्नल ऍड-ऑन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स आणि थर्मल साईट्ससह टीएएसएलच्या त्यांनी इन-हाऊस डिझाईन व विकसित केलेल्या  रिमोट कंट्रोल्ड वेपन स्टेशनचा देखील समावेश आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading