महिलांना हवी सुरक्षितता आरोग्यरोजगार आणि सन्मान – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : “कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना महिलांना हवी सुरक्षितता, चांगले आरोग्य, रोजगार व सन्मान आणि तो फक्त शिवसेना देऊ शकते असा विश्वास महिलांना आहे” असे मत विधान परिषदेच्या उपसभापती  डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

 शिवाजीनगर महिला आघाडी च्या वतीने महिला संवाद या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून त्यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या “सध्या पुणे शहर व परिसरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असून हा अत्यंत चिंतेचा विषय आहे, आपल्या संरक्षणासाठी महिला शक्ती एकवटली पाहिजे”. असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना महिला शहर संघटिका सविता मते यांनी शहरातील कोथरूड शिवाजीनगर मतदारसंघात महिला संवाद या कार्यक्रमांतर्गत महिलांची मते जाणून घेऊन ज्यांना स्वसंरक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व बचत गटाचे फायदे या विषयावर संबंधित खात्याच्या प्रमुखांचे मार्गदर्शन कार्यक्रम राबवत आहेत.

आज मनपाच्या समोर संघटिका लीला सोनोरीकर, पोलीस अधिकारी सुजता  शानमे, उद्योग निरीक्षक शैला वानखडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांनी “महिलांची भगिनींच्या हाकेला मदतीसाठी आम्ही सदैव बरोबर आहोत” अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,माजी नगरसेवक राजू पवार,नीता  मंजाळकर ,छाया भोसले,उमेश वाघ, आनंद मंजाळकर, सीमा वरखडे व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आपल्या कामात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिला कार्यकर्त्या कलावती घाणेकर, करुणा घाडगे,मंदा मूकनाक  यांचा सन्मान आमदार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. पूर्णिमा बहिरट यांनी प्रास्ताविक,स्नेहल पाटोळे यांनी स्वागत, भाग्यश्री सागवेकर यांनी सूत्रसंचालन तर नयना वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका शिंदे, दिपाली बीवाल, सोनिया मुंडे, स्नेहल पाटोळे, शोभा सुर्वे, सोनाली जुनवणे, आशा अहिर, वैशाली पुजारी, दिपाली शिगवण, सोफिया शेख अदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: