Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

….म्हणून मी पळत राजभवनावर गेलो – रामदास आठवले

पुणे : “मी आंबेडकरवादी असल्यानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माझे मित्र आहेत. मला मंत्रीपद जमेल का नाही अशी चर्चा होती. तेव्हा शरद पवारांनी मला मंत्री होण्याची संधी दिली. मंत्री झाल्यावर मी व्हाईट कपडे घेतले होते. मंत्रीपदाची शपत घ्यायला राजभवनावर जायला निघालो आणि ट्रॅफिक होते.  म्हणून मी पळत राजभवनावर गेलो”, अशी संस्मरणीय आठवण आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितली.

निमित्त होते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्ती निमित्त रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आयोजित विशेष मुलाखतीचे. यावेळी निवेदक सुधीर गाडगिळ यांनी आठवले यांची मुलाखत घेतली.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीची आठवण सांगतांना रामदास आठवले पुढे म्हणाले, ‘त्या’ दिवशी मी पळत राज्यभावनावर पोहोचलो. मला इच्छितस्थळी पोहोचायचं असलं की मी पोहोचतोच.  तसेच इतरांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवायचं असलं की त्यांनाही पोहोचवतो, रामदास आठवले  म्हणाले.

भाजप आणि पंतप्रधांनबाबद बोलताना आठवले म्हणाले, भाजप हा आधी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास चा नारा दिला. या धोरणामुळे सर्वधर्मीय लोकांना या पक्षाने आकर्षित केले. पंतप्रधान मोदींसबोत ज्यावेळी भेट होते तेव्हा आमच्यामध्ये गप्पा होतात. महाराष्ट्रात कसं चाललंय? असं ते मला विचारतात. यावर महाराष्ट्रात आपल्यासारखं चांगलं चाललेलं नाहीये असं मला सांगावं लागत.

शरद पवार यांच्याशी अधूनमधून आपला फोन होतो हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आठवले म्हणाले, शरद पवार मला सांगतात की माझ्या जॅकेटची बटणं कशी आहेत. यावर मी पवारांना सांगतो “माझ्या शर्टाची चांगली आहेत बटण, कारण मी खातो मटण” अशा आपल्या खास शैलीत त्यांनी पवारांसोबच्या मैत्रीवर भाष्य केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading