तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील चिमुकल्या स्वराविषयीच्या खास गोष्टी

स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकलेल्या चिमुकल्या स्वराने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका साकारते आहे बालकलाकार अवनी तायवाडे. अवनी मुळची नागपूरची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. अवनीच्या आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवनीला मराठी मालिकेत काम करण्याची खूप इच्छा होती. स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी अवनीने  ऑडिशन दिली आणि तिची निवडही झाली. सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आलीय. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते.

अवनी आणि स्वरामधलं साम्य म्हणजे दोघींचाही स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुरु असलेला प्रवास. या प्रवासातले चढ-उतार मालिकेत पाहायला मिळतीलच. पण चिमुकल्या स्वराच्या प्रेक्षक प्रेमात पडतील हे मात्र नक्की. त्यासाठी पाहायला विसरु नका नवी मालिका तुझेच मी गीत गात आहे २ मे पासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

%d bloggers like this: