क्रिप्स फाउंडेशनच्यावतीने कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

पुणे : देशात विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजविणार्‍या महिलांचा सन्मान करून क्रिप्स फौंडेशनने स्व.भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंडित जवाहरलाल सभागृह घोले रस्ता येथे संपन्न झालेल्या या संगीतमय कार्यक्रम प्रसंगी क्रिप्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर फेरवाणी,सचिव ईश्वर कृपलाणी,प्रमुख पाहुणे मृदुला जोगळेकर,गौरी यरवडकर,किसन रामनाणी. राम जबराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कारीत मान्यवर – अपर्णा सोले,धनश्री कुलकर्णी,जया शहा,लाले बुशेरी,माधुरी चितळे,सोनिया आगरवाल,सुजाता शहा,उषा पुनावाला,तसेच हिना शहदादपुरी,चंदा विराणी. शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमात गीतांजली जेधे यांनी लता दिदींनी गायीलेली विविध गाणी आपल्या सुमधुर आवाजात सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. लता दिदींचे कर्तुत्व असामान्य होते. म्हणून त्यांना कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करून आदरांजली देणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतु होता असे ईश्वर कृपलाणी यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: