श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात रामजन्मोत्सव साजरा
पुणे : श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्यावतीने टिळक चौकातील मंदिरात श्रीरामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्यापासून ते श्रीराम नवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. राम नवमी निमित्त पालखी मिरवणूक व काल्याचे किर्तन उत्साहात पार पडले.
ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, उत्सव प्रमुख महेश अंबिके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोहळा पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर शेडगे, महादेव चव्हाण, पांडूरंग गायकवाड, प्रशांत जोरी व महिला भजनी मंडळाने परिश्रम घेतले. कीर्तन,भजन,प्रवचन, पूजापाठ तसेच महाप्रसाद देखील मंदिरात झाला.