महात्मा फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – रामदास आठवले
पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने आज महात्मा फुले वाड्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांनी त्यांच्या फुले वाड्यातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आठवले यांनी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच भिडे, वाड्याचे देखील लवकरात लवकर, राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे अशी मागणी केली
यावेळी पुणे शहराचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण ,माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे ,परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, महिपाल वाघमारे, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, संगीता आठवले, शशिकला वाघमारे, संजय सोनवणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
