फक्त अजाण ला प्रत्युत्तर म्हणूनच हनुमान चालीसा वाजवायचा का..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची पोस्ट चर्चेत

पुणे : ईस्लाम धर्माच्या चालत आलेल्या परंपरे नुसार मशीदी मध्ये नित्य नमाज पुर्वी अजाण म्हणण्याची परंपरा आहे. व ती ईस्लाम धर्मिय निभावत आले आहेत.. तसेच हिंदू घर्म परंपरे प्रमाणे तिरूपती बालाजी’सह शिर्डी, महालक्ष्मी, चित्रकुट, पुष्कर, नारायणपूर ते पंढरपूर – आळंदी इ सह अनेक तिर्थ क्षेत्रात सकाळ, दुपार, सायंकाळ व रात्री ची शयन आरती इ स्पीकर वर होतात. तसेच शिख समाजाच्या गुरूद्वारा वर, जैन मुनींच्या तिर्थ स्थानावर देखील धार्मिक भजन किर्तन मंदीरांच्या स्पीकर वर म्हंटले जाते. भारत हा विविध धर्म परंपरांचा व संस्कृतींचा देश आहे. विविध धर्मिय एकमेकांच्या धर्मांची आस्था व श्रध्दा जोपासत बंधू भावाने व सामाजिक सौख्य व सामंजस्य राखत, शांततेच्या वातावरणात नांदत आहेत.

परंतू, देशातील वाढती गरीबी, महागाई, बेरोजगारी, भुकबळी व घटता विकास दर” या प्रश्नांवर केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरत असून सामाजिक सलोखा व बंधूभाव जाणीव पुर्वक बिधडवण्याचे कारस्थान भाजपचे धुरींदर नेते करत असून सामान्यांच्या नित्य जीवनावश्यक प्रश्नांवरून ‘जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा निंद्य व जीवघेणा खेळ’ भाजप नेते करीत असून समाजात एक मेकांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा व एकमेकां विषयी मत्सर व द्वेष पसरवण्याचे कुटील प्रयत्न होत आहेत, असा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये केला आहे.

मा ऊच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर देखील भाजप प्रणीत फडणवीस सरकारने स्वतःचे कालावधीत मात्र मशीदींवरील भोंग्यावर का कारवाई केली नाही? त्यांना त्या वेळी कोणी रोखले होते..? असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी फेसबूक व ट्वीटर वर लिहिलेल्या लेखात केला. आम्ही काँग्रेसचे लोक धर्मनिरपेक्षता व संविधान मानणारे असलो तरी आम्ही देखील हिंदू धर्म संस्कार पाळणारे व खऱ्या अर्थाने हिॅदू धर्म श्रध्दा कृतीने निभावणारे आहोत. परंतू भाजपचे तथाकथित हिंदुत्ववादी म्हणवणारे मात्र “श्रध्देने नव्हे तर अजाण ला प्रत्यूत्तर म्हणून” हनुमान चालीसा’ वाजवणार असतील, तर ते श्रध्देने हिंदू धर्म – संस्काराचे आत्मसात करणे नव्हे, तर दिखावूपणा वा अवडंबर करणे ठरेल. असे करून खऱ्या खुऱ्या हिंदूंच्या प्रभू श्री हनुमान विषयी व ‘हनुमान चालीसा विषयी च्या श्रध्देचे महत्व व गरीमा व गांभीर्य’ कमी करू नये. असे विनंती वजा आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी केले. पेक्षा ‘वायूपुत्र व प्रभू श्रीराम भक्त हनुमान’ यांची तत्व व स्वामी निष्ठा लक्षात घेऊन, जन्माने ब्राम्हण असलेल्या, परंतू अन्याय व अधर्माने पझाडलेल्या ‘रावणास’ देखील धडा शिकवणाऱ्या, पाप व मायारूपी सोन्याच्या लंकेचे दहन करणाऱ्या श्री हनुमानाची भक्ती केंद्रे ऊभारण्यात (हनुमान चालीसा भोंग्यावर लावणाऱ्यांनी) अधिक वेळ खर्च केल्यास ते सत्कारणी लागेल व त्याचे पुण्य लाभल्य्यास खोटे पणाची पापे काही प्रमाणात धुऊन जातील, असे ही गोपाळदादा म्हणाले.

या धार्मिक ऊन्माद वाढवण्याचे राजकीय धूरीणांचे प्रयत्न व बेजबाबदार ऊथळ प्रकार असेच सुरू राहिल्यास ‘हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार’ नव्हे, तर ‘सामाजिक दुही व अशांतता वाढण्याचीच अधिक शक्यता’ आहे.. त्यामुळे जनतेने देखील या विषयी कृतीशील भूमिका घेणे गरजेचे असून, सामाजिक सलोखा, शांतता, संविधानास अपेक्षीत घर्म निरपेक्षता देशात टिकून राहण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत ही गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले.


आम्ही स्वत: देखील हरी-नाम, नामस्मरण व अखंड हनुमान चालीसाचे सप्ताह – अखंडीत केले आहेत! त्यामुळे हनुमान चालीसाचे महत्व व त्याचे गांभीर्य आमचे ठायी असून असला पोरकट पणा करणाऱ्यांना जनता रस्त्यावर येऊन धडा शिकवेल, असा ईशारा देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला!

Leave a Reply

%d bloggers like this: