सुमधूर वाद्य वादनातून उमटला नाद रंग

सद्गुरु श्री जंगली महाराज १३२ व्या पुण्यतिथी उत्सवात यांच्या वादनाचा कार्यक्रम 

पुणे : तबल्यावर पडणारी थाप… घुंगरांचा नाद…ढोलकीचा ताल आणि सोबतीला टाळांचा नादमय लय अशा संगीतमय वातावरणात कलाकारांनी विविध प्रकारच्या तालमय वाद्यातून नादरंग निर्माण केले.

निमित्त होते, श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राजेंद्र दूरकर यांच्या नाद रंग कार्यक्रमाचे. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. 

केदार मोरे, पद्माकर गुजर, राजेंद्र साळुंखे, प्रतिक गुजर, अपूर्व द्रविड, ऋतिक गुजर या कलाकारांनी आपली अप्रतिम कला सादर करून रसिकांना पारंपारिक वाद्याचा मनसोक्त आनंद दिला. शंख वादनाने नाद रंग कार्यक्रमाची सुरुवात झाली पखवाज मधून  निर्माण होणारे भक्तिमय ताल, अप्रतिम ढोलकी वादन आणि त्याला मिळणारे घुंगरांची साथ यातून कलाकारांनी लावणीचे वातावरण निर्माण केले. प्रेक्षकांनीही वाद्यवादनला टाळ्यांच्या स्वरूपात अप्रतिम प्रतिसाद देत कलाकारांचा उत्साह वाढविला.

राजेंद्र दुरकर म्हणाले, तालवाद्यांनीच आम्हाला कलाकार म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे. ताल वाद्य वादन अतिशय सोपे आहे. हा कोणताही क्लिष्ट प्रकार नाही. सर्वसामान्य माणूस त्याला संगीताची फारशी माहिती नाही त्यालाही या ताल वाद्यांच्या वादनातून  अप्रतिम संगीताचा आनंद मिळू शकतो असेही राजेंद्र दूरकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: