कोरोना लसीच्या बूस्टर डोसला सुरुवात, खाजगी रुग्णालयासाठीही दर निश्चित

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीचा (corona vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) लागू करण्याचा निर्णय सरकारने (Government) घेतला आहे. बूस्टर डोस 10 एप्रिलपासून म्हणजेच आज  सुरू होणार आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी (Union Health Secretary) शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांना सांगितलं आहे की, खासगी लसीकरण केंद्रांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोस दरम्यान 150 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. ही कमाल 150 रुपये शुल्क कोरोना लसीच्या किंमतीपेक्षा वेगळी असेल. यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की, ज्या व्यक्तीला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे, त्याच लसीचा बूस्टर डोसही मिळेल. बूस्टर डोससाठी कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही. कोविन अॅपवर आधीच केलेल्या नोंदणीद्वारे बूस्टर डोस लागू केला जाईल.

कोविड-19 चा बूस्टर डोस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खासगी लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असेल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. त्याच वेळी, लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं आहे की, पात्र लोकांसाठी त्यांच्या कोविशील्ड लसीच्या बूस्टर डोसची किंमत प्रति डोस 225  रुपये असेल.

Leave a Reply

%d bloggers like this: