महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षा नित्तूरे हिला दुहेरी मुकुट 

 
सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला . 
 
एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत  दुसऱ्या मानांकित सोलापूरच्या प्रगती सोलनकरचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 
 
दुहेरीत अंतिम फेरीत नवी मुंबईच्या आकांक्षा नित्तूरे हिने आपली शहर सहकारी अलिशा देवगांवकरच्या साथीत सोलापूरच्या प्रगती सोलणकर व ज्योत्स्ना मदने या अव्वल मानांकित जोडीचा  6-2, 6-2 असा  पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेचे माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू माया खंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा निरीक्षक सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.     
 
निकाल: महिला: एकेरी: उपांत्यफेरी: 
आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)[1] वि.वि.ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[3]  4-0, 4-1
प्रगती सोलनकर(सोलापूर)[2] वि.वि.कांचन चौगुले(सोलापूर)[4] 4-1, 4-2
अंतिम फेरी: आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)[1] वि.वि.प्रगती सोलनकर(सोलापूर)[2]6-0, 6-3;
 
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
प्रगती सोलणकर(सोलापूर)/ ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[1] वि.वि.तनया चौधरी(नागपूर)/कल्याणी सोमेवार(नागपूर)4-0, 4-2;
आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)/अलिशा देवगांवकर(मुंबई उपनगर)[2] वि.वि.नुपूर गुप्ता(नाशिक)/तन्वी तावडे(पुणे)4-0, 4-0;
अंतिम फेरी: आकांक्षा नित्तूरे(नवी मुंबई)/अलिशा देवगांवकर(मुंबई उपनगर)[2] वि.वि.प्रगती सोलणकर(सोलापूर)/ ज्योत्स्ना मदने(सोलापूर)[1] 6-2, 6-2. 

Leave a Reply

%d bloggers like this: