भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

कोल्हापूर: भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.  देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, लोकांनी झिडकरला. हिंदू हृदयसम्राट म्हणल्यावर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे . हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मर्दाने मर्दासारखे लढलं पाहिजे, ते कसं लढतात हे कोल्हापूरकरांकडून शिकलं पाहिजे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. काल फडणवीस येऊन गेले. भाजपकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे काही सांगण्यासारखे नाही मग धार्मिक मुद्द्यांव पुढे केले जातात.  गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली होती का नाही? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे. शिवसेना समोरुन वार करतो, पाठित वार करण्याची आमची परंपरा नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “महापुरानंतर मी आणि फडणवीस एकाच ठिकाणी पाहणी केली, आम्ही काय केलं, काय नाही ते जनतेसमोर होऊ दे म्हणून गेलो. बेंबीच्या देटापासून भाजपवाले ओरडून सांगत होते, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. 2014 साली समझोता होत असताना अचानक युती तोडली, 2019 साली युतीत असताना भाजपची 40 हजार मतं कुठं गेली? गेल्या वेळी तुम्ही छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केली होती की नाही सांगा.” फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शिवसेनेवर टीका करताना म्हटले होते की, पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात पूर्वी बाळासाहेबांचा फोटो असायचा. आता सोनियाजींचा फोटो असतो. यावर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड प्रतिक्रिय दिली. ते म्हणले, फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच नव्हे. अटलजींचाही फोटो होता. नरेंद्र मोदींचाही फोटो होता. तुम्ही ही परिस्थिती निर्माण केली. तुम्हाला जर हिंदुहृदय सम्राटांबद्दल प्रेम असेल तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब असं लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या एका खोलीत तुम्ही अमित शहांनी मला दिलेले वचन का पाळले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. भाजपचे हिंदूहृदय सम्राटांवर एवढंच प्रेम असेल तर नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्यास भाजपाचा एवढा विरोध कशासाठी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारनी दिलं. ते काम आम्हाला करावं लागलं. भाजपने भगव्यावरून सुरु केलेल्या राजकारणावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो भगवा? तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यामागे निळा, काळा, हिरवा लावाल आणि म्हणाल तर तो भगवा आम्ही स्वीकारणार नाही. अस्सल भगवा शिवरायांचा, साधुसंतांचा आणि वारकऱ्यांचा आहे. याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाहीये..

Leave a Reply

%d bloggers like this: