Friday, June 5, 2026
Latest NewsSports

Friendship Trophy – साई पॉवर हिटर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, तुळशीबाग टस्कर्स, जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, तुळशीबाग टस्कर्स आणि जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महेश नानगुडे याच्या ७० धावांच्या जोरावर साई पॉवर हिटर्स संघाने शितळादेवी सुपरनोव्हाज् संघाचा १०७ धावांनी सहज पराभव केला. साई पॉवर हिटर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ षटकात १५४ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाला उत्तर देताना शितळादेवी सुपरनोव्हाज् संघाला केवळ ४७ धावा करता आल्या.

यश ठाकूर याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुरूजी तालिम टायटन्स् संघाने राजाराम रायडर्स संघाचा ३ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुरूजी तालिम टायटन्स् संघाने ६२ धावांचे आव्हान उभे केले. याला उत्तर देताना राजाराम रायडर्सचा डाव ५९ धावांवर मर्यादित राहीला. यश ठाकूर याने १६ धावात ३ गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.

सचिन थिटे याच्या अचूक गोलंदाजीमुळे तुळशीबाग टस्कर्स संघाने नादब्रह्म ड्रमर्स संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. कुणाल भिलारे याच्या ४९ धावांच्या जोरावर जोगेश्‍वरी जॅग्वॉर्स संघाने दगडुशेठ वॉरीयर्स संघाचा ४४ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
१) साई पॉवर हिटर्सः ८ षटकात ४ गडी बाद १५४ धावा (सागर थरकुडे ५१ (१८, २ चौकार, ६ षटकार), महेश नानगुडे ७० (२२, ५ चौकार, ७ षटकार), सागर आंग्रे २३) वि.वि. शितळादेवी सुपरनोव्हाज्ः ८ षटकात ५ गडी बाद ४७ धावा (गणेश बानगवे २०, सोमनाथ शिवाजी १५, महेश नानगुडे १-१०); सामनावीरः महेश नानगुडे;

२) गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ८ गडी बाद ६२ धावा (निवृत्ती पोळेकर १९, रणवीर परदेशी १२, सुशिल फाले १२, अजय दळवी २-१५) वि.वि. राजाराम रायडर्सः ८ षटकात ९ गडी बाद ५९ धावा (सागर फडतरे २८, विवेक गायकवाड ११, यश ठाकूर ३-१६, निवृत्ती पोळेकर २-११); सामनावीरः यश ठाकूर;

३) नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटाकात ७ गडी बाद ५२ धावा (स्वप्निल परदेशी १८, शुभम जैन १९, सचिन थिटे ४-१३) पराभूत वि. तुळशीबाग टस्कर्सः ६.१ षटकात २ गडी बाद ५५ धावा (नितीन पंडीत नाबाद २१, महेंद्र ब्रह्मे १६, किरण पतंगे १०); सामनावीरः सचिन थिटे;

४) जोगेश्‍वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ५ गडी बाद ८६ धावा (कुणाल भिलारे ४९, अनिकेत काळेकर १८, अमोल चव्हाण १-१५) वि.वि. दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ८ गडी बाद ४२ धावा (अक्षय बोरावके १४, अभिषेक घरमळकर १०, तुशार आंबट २-८); सामनावीरः कुणाल भिलारे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading