शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो -राजेश टोपे

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी एसटी कामगारांनी गोंधळ घातला आहे. एसटी कामगारांनी  शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी घुसून चप्पल फेक देखील केली आहे. त्यामुळे हा एसटी कामगारांचा  वाद आता थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोचला होता. 

हे काही जे घडूव आणलं हे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हल्ला घडवून आणला शरद पवार महाराष्ट्राचे सर्व सर्वा आहेत. ते कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण कसे करायचे याची पण चर्चा केली होती एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी तिथे ओरडून एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले आम्ही तुमचे प्रश्न लवकर सोडू तरी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी चप्पल फेक केली. हे एसटी कर्मचाऱ्यांचे काम नाही हे कुणीतरी ठरून शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला आहे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे लवकरच या घटनेबद्दल चौकशी करून लवकरच सोक्षमोक्ष लावतील आम्ही या घटनेचा आज निषेध करत आहोत असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकारांना माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, हा आज जो प्रकार झाला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही.  पुण्यात एका महिलेची किडणी काढून विकण्यात आली त्यावर राजेश टोपे म्हणाले हे खोटे कागदपत्र देऊन त्या महिलेची किंडणी विकण्यात आली आम्ही याबाबत बैठक घेतली असून लवकरच या घटनेचा तपास करून आम्ही गुन्हेगारांवर लवकरच कारवाई करणार आहे. व ही कागदपत्रे कोणी बनवली कुठल्या राज्यातून आली याचा आम्ही शोध घेणार आहोत .असे राजेश टोपे म्हणाले. हे प्रकार आधी सुद्धा घडले असतील यासाठी आम्ही वेगळी पोलिस यंत्रणा बसवणार आहोत व नक्कीच आम्ही त्याचा लवकरात लवकर शोध घेऊ .असे राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: