अभाविपचे विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशासन जगावो आंदोलन!
पुणे: मागील २ वर्षापासून करोनामुळे विद्यापीठ परिसर बंद होता, मात्र आता मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठ परिसरात शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक, लेक्चर व परीक्षा सद्या सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणानंतर आता ऑफलाईन शिक्षण सुरू झाले असून विध्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत आहेत. विद्यापीठातील सर्व सोयी सुविधा मध्ये बिघाड झाली असून विद्यार्थ्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा या संदर्भात अभाविप कडून निवेदन देण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्व सोयी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविप ने आज विद्यापीठ प्रशासन जगावो आंदोलन केले. यामध्ये खालील मागण्याचा समावेश होता
• हॉस्टेल 100% क्षमतेने सुरु करून पूर्वीची कायदेशीर गेस्ट पद्धत सुरु करावी.
• विद्यार्थिनी हॉस्टेल मधील पाण्याचा तुटवडा तत्काळ सुरळीत करावा.
• विद्यापीठ आवारातील जेवणाची (मुख्यतः भोजनगृह) गुणवत्ता सुधारण्यात यावी.
• विद्यापीठ आवारातील झेरॉक्स सेंटर तत्काळ सुरू करावे.
• वसतिगृहातील व विद्यापीठ परिसरातील इंटरनेट (wifi) चा विस्कळीत वेग सुधारण्यात यावा.
• सर्व वसतिगृहातील reading हॉल सुरु करण्यात यावे.
• E-Vehical तत्काळ सुरू करावे.
या मागण्याचे पत्र प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आंदोलन स्थळी येऊन स्वीकारले. सादर मागण्या ताबडतोब पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अभाविप येत्या काळात आनखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला. यावेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल, विद्यापीठ नगर मंत्री प्रसाद शिंदे व इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
