विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी कोट्यवधी रुपये पीएमसी बँकेच्या माध्यमातून व्हाईट केले – संजय राऊत

मुंबई : आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी  रुपये गोळा करून पीएमसी बँकेच्या माध्यमातून ते व्हाईट केले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. आज मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील काळात देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील असेही ते म्हणाले.

बुधवारी ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर कारवाई केल्या नंतर आज खासदार संजय राऊत मुंबईत परतले. यावेळी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी करीत शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, आएनएस विक्रांतचा घोटाळा झाला त्याच्या विरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. आज झालेले हे शक्तीप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चिड आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हल्ला करत आहे.

दरम्यान, आज विक्रांतच्या मुद्द्यावरुन राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. भाजपचे खासदारांसुद्धा यावर बाजू मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: