Pune : हरवले, ‘दादा परत या’ चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनर

पुणे : ‘किमान शब्दात कमाल अपमान’ असं पुणेकर आणि पुणेरी पाट्यांबद्दल मजेत म्हटलं जातं. देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अतिशय खोचक, नेमक्या आणि शब्दात असलेल्या पाट्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतातच.
पण आता पुण्यातील काही बॅनर देखील सगळ्यातं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं आहे. कारण हे बॅनर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे. पुण्यातील कोथरुड भागात काही अज्ञातांनी स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बॅनर लावले आहेत. ‘दादा परत या’, ‘हरवले आहेत’ अशा आशयाचे हे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
एका बॅनरमध्ये चक्क चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावून ‘हरवले आहेत’ असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. “पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा. समस्त कोथरुडकर असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
दादा परत या’ असा उल्लेख केलेल्या बॅनरवर लिहिलं आहे की.”दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या आम्ही तुमची वाट पाहतोय. समस्त कोथरुडकर. असे कोथरूड मध्ये बॅनर झळकत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: