पुण्यातील अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह २०२२ मध्ये ‘मिरॅकल ५’चे अग्रेसर स्थान

पुणे : राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी ), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ( एमपीसीबी ),मराठा चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्रीजअँड अँग्रिकल्चर( एमसीसीआयए) यांच्या संयुक्त विद्यमान अंतर्गत पुणे येथे अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह (एएफसी) ह्या मेगा इव्हेंट उपक्रमात गजबजलेल्या पुणे शहराला पहिली वहिली ई-बाइक देणारा मिरॅकल५ ने आपले अग्रेसर स्थान प्रस्थापित केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यायी इंधन तंत्रज्ञानामध्ये संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करून महाराष्ट्राला या क्षेत्रातील अग्रगण्य म्हणून प्रस्थापित करणे, तसेच स्वच्छ मोबिलिटीसाठी महत्त्वाच्या भागधारकांमध्ये परस्परसंवादासाठी एक मंच प्रदान करणे हे आहे.

ऑटोमोटिव्ह उद्योगातील पुण्याचा वारसा जपत मिरॅकल ५ ब्रँडने या प्रदर्शनातील अग्रदूतांपैकी एक होऊन पर्यायी इंधन कॉन्क्लेव्हला आपला पाठिंबा दिला. प्रदर्शकांमध्‍ये एक मोठी जागा मिळवून समर्थनाचे विधान करून, मिरॅकलला वाहनांचे उत्सर्जन कमी करण्याच्या कारणासाठी आपली एकता घोषित करायची होती.

कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी भारतातील सर्वात मोठी ई-बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सर्व सहभागींनी ईव्ही चालवल्या आणि २५ किमी अंतरावर शहरभर धाव घेतली. मिरॅकल ५ ने या रॅली कार्यक्रमाला एक मनोरंजक रचना दिली. नऊवारी साडीच्या रूपात त्यांचा मराठा अभिमान परिधान करून, मिरॅकल ५ च्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी महिलांनी एकाच वेळी महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक अभिमानाचा मजबूत संदेश दिला.

गेल्या १७ वर्षांपासून स्वच्छ इंधनाचा निःसंदिग्ध प्रचारक असल्याने, मिरॅकल ५ पर्यावरणपूरक वैयक्तिक वाहतूक लोकप्रिय करण्याच्या सतत मोहिमेवर आहे. मोठ्या ग्राहकसंख्येमुळे आणि ऑटोमोटिव्ह उत्पादनातील प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हे पर्यायी इंधनाचे प्रमुख केंद्र आहे

Leave a Reply

%d bloggers like this: