अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, मागील वर्षीच आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आसावरी जोशी यांचा जन्म 6 मे 1965 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपाणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांचं काम पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 1986 ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: