मला पक्ष प्रवेशासाठी फक्त मोदींचा फोन येणे वाकी आहे – वसंत मोरे

पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात पुणे मनसे अध्यक्षपदावरून वसंत मोरे यांना अखेर हाटवण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे मनसेच्या अध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून खूप लोक मला मनसे सोडण्यासाठी संपर्क करत आहेत. मात्र मी सर्वांना आत्ताच मनसे सोडण्याचा विचार नाही.असे सांगत आहे. ज्या दिवशी माझ्या मनात अस विचार येईल त्या दिवशी मी उघडपणे सांगेल. असेच मी सर्वपक्षीय लोकांना सांगत आहे, असेही वसंत मोरे म्हणाले आहे.

गेली सत्तावीस वर्षे मी राज ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे पुढेही त्यांच्या सोबत राहीन. माझं साहेबांशी काही बोलणं झालं नाही, मात्र माझं पुण्याचं अध्यक्षपद गेलंंय. मात्र अजूनही माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही. मला अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, असेही ते म्हणाले. मी थोडासा सेंटिमेंटल आहे, हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे, तसेच मला इतर पक्षात येण्यासाठी आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोन यायचा बाकी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी पुणे मनसेचे अध्यक्षपद गेल्यानंतर दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले, मी मनसेत राहण्यावर ठाम आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे.तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: