राज्यपाल हे भाजपचे शाखाप्रमुख – संजय राऊत
मुंबई : राज्यात भाजपचं सरकार न आल्यानेच खोट्या कारवाया केल्या जात आहेत. तुम्ही राजकारणालते मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. केंद्रीय यंत्रणेचा शिखंडीसारखा वापर करुन मागे वार करु नका, असा टोला संजय राऊत यांनी भाजपावर लगावला. तसेच ‘राज्यपाल हे भाजपचे शाखाप्रमुख आहेत’, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली.
बुधवारी ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर कारवाई केल्या नंतर आज खासदार संजय राऊत दिल्लीहून मुंबईत परतले. यावेळी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी करीत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेनेच्या वाघाला तुम्ही डिवलचलंय
राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही असं विरोधकांनी समजू नये. आम्ही शिवसैनिक आहोत. आमचं आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेबांसोबत गेल आहे. एका मर्यादेपर्यंत संयम पाळला, आता खूप झालं. शिवसेनेच्या वाघाला आता तुम्ही डिवलचलंय असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.
मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलेय का?
संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. त्या भेटीवरुन चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधत, ‘शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देत संजय राऊत म्हणाले, ‘मी शिवसेनेमध्ये असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो. मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलेय का?’.