… म्हणून मी पण मनसेतून बाहेर पडले – रुपाली पाटील ठोंबरे

वसंत मोरे यांना पदावरून काढल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून काढून टाकत साईनाथ बाबर यांना नवीन शहराध्यक्ष पद दिले आहे. या संपुर्ण राजकिय नाट्यांतर पुण्यासह राज्यातील मनसेमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मोरे यांच्यावरील कारवाईनंतर मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या की, वसंत मोरे हे जन सामान्यांमध्ये सहभागी होऊन प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मी स्वतःदेखील त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. मात्र, ज्या प्रकारे मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढण्यात आले, ही अत्यंत दुर्देवी गोष्ट आहे. तसेच अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेल्याचा आरोपही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. मी देखील अशाच पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मनसेतून बाहेर पडले, असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. तसेच वसंत मोरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या काळजीतून भोंग्यांबाबतच्या भूमिकेला विरोध केल्याचे सांगितले.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: