राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

पुणे : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे मनसेच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. मनसेचे माजी  शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मशीदींच्या भोंग्यांला आपल्या प्रभागात लावायला विरोध केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नगरसेवक साईनाथ बाबर यांना मनसे शहर अध्यक्षपदी निवड केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी जे वक्तव्य केले त्यामुळे काही समाजातील लोक नाराज झाले आहेत. जे लोक वसंत मोरे यांचे शहराध्यक्ष पद काढून घेतल्यामुळे नाराज झाले असतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करावा, असे आवाहन मी करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: