भाजपा स्थापनादिनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात रक्तदान शिबिर

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कोथरूड मधील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत, ७० बाटल्या रक्त संकलित केले.

भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोथरूडचे आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला कोथरूडकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी जवळपास ७० बॉटल रक्त संकलित झाले.

यावेळी भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, अनुराधाताई येडके,माजी नगरसेविका व शिक्षण मंडळ अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर,छायाताई मारणे, वासंतीताई जाधव, हर्षालीताई माथवड,वृषालीताई चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यन्त मोहोळ,राहुल कोकाटे, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, अमित तोरडमल, ऍड. रुपेश भोसले,कल्पनाताई पुरंदरे, सुवर्णाताई काकडे,शिवाजी शेळके व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. राहुल देशपांडे,अमित शिंदे यांनी मेहनत घेतली. रक्तदान शिबीरात सहभागी रक्तदात्यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: