सुश्राव्य गायनाने कलाकारांची संगीत सेवा

पुणे : विविध प्रकारच्या बंदिशीनी नटलेले गायन,  सुमधुर रागाने निर्माण केलेले शास्त्रीय संगीत यासह वादक आणि गायकांनी आपल्या अप्र कला सादरीकरणाने संगीत सेवा सुर आणि संगीताच्या माध्यमातून अर्पण केली. पं. विजय कोपरकर यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने या कार्यक्रमात रसिकांना अप्रतिम अशा गायनाचा आनंद दिला.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संगीत सभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पं. विजय कोपरकर यांनी संगीत सेवा दिली.  ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. विवेक भालेराव यांनी त्यांना तबल्यावर तर राहुल गोळे यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली.
पंडित विजय कोपरकर यांनी ‘मोरी मैया, मोरी मैया’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘भवसागर संसार संसार मोरी मैया’ , ‘कैसे बताऊ मे तेरी ये मोरी माला जपे, कैसे बताऊ तेरी मेरी प्रीत घणी’ यांसह अनेक अजरामर गीते सादर करुम रसिकांना मंत्रमुग्ध केले.  या संगीतमय कार्यक्रमात हार्मोनियम आणि गायनाची जुगलबंदी, हार्मोनियम आणि तबल्याचे अप्रतिम वादन तसेच हार्मोनियम तबला आणि गायन यांचा सुरेख मिलाफ रसिकांनी अनुभवला.

Leave a Reply

%d bloggers like this: