परिमॅचतर्फे ब्लॉगर्ससाठी बाझी ब्लॉगर्स की स्पर्धेचे आयोजन

पुणे : जागतिक पातळीवरील  आयगेमिंग कंपनी आणि टेक्नोलॉजी कंपनी परिमॅच तर्फे इंडियन प्रीमिअर लीगच्या लाँचसह ‘बाझी ब्लॉगर्स की’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात  आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ब्लॉगर्समध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे आणि त्यांच्या चाहत्यांना ३ आयफोन १३ आणि सात एअरपॉड्स अशी आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांना  वैशिष्ट्यपूर्ण आणि मजेदार आव्हाने अनुभवायला मिळणार आहेत . या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी ब्लॉगर्सना त्यांची सर्वोत्तम  कामगिरी करून दाखवावी लागणार आहे . या  स्पर्धेचे  सूत्रसंचालन मिलीयनेअर ब्लॉगर अभिषेक मल्हान करणार आहे.

 

बाझी ब्लॉगर्स की हि स्पर्धा पूर्ण एप्रिल महिन्यात सुरु राहणार असून  नवी  आव्हान असलेला ब्लॉगरचा व्हिडियो शो एप्रिलच्या दर आठवड्याला प्रदर्शित  होणार आहे . या स्पर्धेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रामुख्याने  दिल्ली येथील  चांदणी चौक येथे ट्रेझर हंट फुड चॅलेंज, २४ तासांत कोण सर्वाधिक कमाई करू शकेल, १००  मिस्ट्री डोअर्स चॅलेंज,  देसी स्क्विड गेम्स,  १०० यूट्युबर मिस्ट्री बटण चॅलेंज   इ चा समावेश आहे.  डब्ल्यूडब्ल्यू डॉट बाझी जीत की  डॉट इन  या वेबसाइटवर सहभागी विजेत्यांचा अंदाज सांगू शकतात.

परिमॅच इंटरनॅशनलचे सीएमओ दिमित्री बेलिआनिन म्हणाले की  आयपीएल हा भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी साठी उत्साहवर्धक कालावधी  असतो. लोक त्यांच्या आवडत्या टीमला प्रोत्साहन देत आहेत,तसेच अंदाज बांधत असतात . या उत्साहाच्या आधारे आम्ही एक औत्सुक्यपूर्ण स्पर्धा सादर केली आहे. या निमित्ताने प्रत्येकालाच चॅम्पियन होता येणार आहे आणि त्यांची ट्रॉफी जिंकता येणार आहे. कोणता इन्फ्लुएन्सर जिंकेल याचा त्यांना अंदाज बांधून बक्षीसे मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे. प्रत्येक स्पर्धक उत्तम कामगिरी करत  आपल्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल  अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: