ऑटो हँगरने लॉन्च केले आपले लक्झरी प्री-ओन्ड कार शोरूम

पुणे : ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या, ऑटो हॅंगर अॅडव्हांटेजने आपल्या दूसर्या लक्झरी प्री ओन्ड कार शोरूमचे उद्घाटन केले आहे.बाणेर स्थित या नवीन शोरूममध्ये ४,५०० चौ. फुटाहून अधिक मोठा रिटेल डिस्प्ले आहे. ऑटो हँगर अॅडव्हांटेजकडे लक्झरी अश्या जुन्या कारची सर्वात मोठी यादी आहे. ऑटो हँगर अॅडव्हान्टेज आता पुण्यातही प्रीमियम ब्रॅण्ड्सची खरेदी आणि विक्री करतील. जसे की मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी, व्होल्वो आणि जग्वार लँड रोव्हर सारखे ब्रँड. लॉन्च प्रसंगी मोहन मारीवाला, व्यवस्थापकीय संचालक, ऑटो हँगर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, “भारतातील प्री-ओन्ड कार मार्केट गेल्या दहा वर्षांत दहापट वाढले आहे आणि आता जवळपास दुप्पट झाले आहे. नवीन कार बाजार म्हणून आम्हाला वाटते की वॉलेट योगदानातुन लक्झरी सेगमेंट आणखी वाढण्यास तयार आहे. आम्ही लक्झरी कार व्यवसायातील आमच्या २५ हून अधिक वर्षांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. आम्ही महत्त्वाकांक्षी, ब्रँड खरेदीदाराला लक्ष्य करू,

ऑटो हँगर अॅडव्हांटेज ब्रँड खोलण्यासाठी आम्ही पुणे हे मोक्याचे ठिकाण निवडले आहे. आम्हाला या शहरातून आणि आसपासच्या शहरांतुन जसे की सातारा, कोल्हापूर आणि औरंगाबाद यांसारख्या शहरांमधून खूप मागणी आहे. जेथे ग्राहक लक्झरी ब्रँडची वाहने वापरण्यास प्राधान्य देतात. या शहरांमधील अंतरामुळे ग्राहकांना प्रवास करणे आणि ऑफरवर असलेल्या वाहनांची विस्तृत श्रेणी पाहणे आणि आमच्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करणे सोपे होते.

 ऑटो हँगरकडून जुणी लक्झरी वाहने खरेदी करण्याचा फायदा असा आहे की विकली जाणारी सर्व वाहने पूर्णपणे तपासली जातात. जी कमी प्रमाणात वापरली जातात आणि यावर एका वर्षाची वॉरंटी दिली जाते. आमची टीम ग्राहकांच्या गरजांनुसार वाहनाची काळजीपूर्वक निवड करण्यात मदत करते. ज्यात आम्ही विक्री, विमा . विक्रीनंतरची सेवा, त्रासमुक्त अनुभव, ऑफर, आदि आवश्यक गोष्टींसाठी मदत करतो. पुढे कोणत्याही कारणास्तव ग्राहक समाधानी नसेल तर वाहन खरेदी केल्यापासून पाच दिवसांच्या आत परत करण्याचा पर्याय देखील आहे आमचा विश्वास आणि सेवेचा वारसा आम्ही या व्यवसायात गेल्या 25 वर्षांपासून चालवत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: