संत सोपानकाका पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करा; आमदार विजय शिवतारे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे :  संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते. तरी हा रस्ता अजून व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी हा पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विजय शिवतारे यांनी लिहिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुणे पंढरपूर महामार्गावरील संत सोपान काका पालखी मार्गाचे काम आपल्या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार भूमिपूजन पार पडले पडले.सध्या हा रस्ता राज्याच्या बांधकाम विभागाकडे आहे.मात्र हा रस्ता केंद्राकडे वर्ग करून त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करा अशी मागणी विजय शिवतारे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: