राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते – गुलाबराव पाटील यांची टीका

पुणे : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. राज ठाकरे त्या तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत, अशी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बातचीत करताना केली.

गुलाबराव पाटील म्हणाले, मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेब कार्यक्रम आहे. कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

हनुमान चालीसावर प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील म्हणाले की, हनुमान चालीसा लावली पाहिजे कोणाची मनाई आहे. भोंगा उतारा म्हणणारा कोण आपला बाप.. बाळासाहेब ठाकरे हे आहे. त्याकाळी कोणाची हिंमत झाली नाही. पाहिले आम्ही पिक्चर काढले हे सेकंड पिक्चर आहे. मागच्या वेळेला ही राज ठाकरे यांनी असे अनेक वेळा विधान केलं आहे. उतरले का भोंगे…बोलणे सोपं आहे करणे कठीण आहे असा टोला देखील यावेळी पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: