उनकी Mentality खराब है, नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवा एका जाहीर सभेत महा विकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यावर विविध मंत्र्यांनी व नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या .त्यावर देश एक संघ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. कुठल्या ही समाजाबद्दल बोलण चुकीचं आहे. जातीयवाद करायची गरज नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा सर्ड्यासारखे माणसं रंग बदलतात. उनकी mentality खराब है, असा टोला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज ठाकरेंना पुण्यात पत्रकारांशी बातचीत करताना लगावला.
पुणे येथे आयोजित इंधन परिषदेच्या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांना इलेक्ट्रॉनिक वाहनांचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या संदर्भात शनिवारी पुणे पर्यायी इंधन परिषद भरविण्यात आली. या परिषदेवरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुण्यामधील हा पर्यायी इंधन परिषद उमेदीचा उपक्रम आहे. आम्ही हायड्रोजनवर काम करत असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.
पुण्यामधील हा पर्यायी इंथान परिषद उमेदीचा उपक्रम आहे. आम्ही हायड्रोजन इंधनावर काम करतो आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र उतरणार आहे. सर्व कंपनी बरोबर आम्ही चार्जिंग स्टेशनवर चर्चा करतो आहे. ८५ पैसे दुचाकी आणि १ रुपयात चारचाकी इलेक्ट्रिकवर धावू शकते. तर त्यामुळे कमी खर्चात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार असल्याचे नितीन राऊत म्हणाले.
