fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इतर भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड नको – मुख्यमंत्री  

मुंबई : भाषेनुसार प्रांतरचना झाली मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. या राज्यात दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मरिन ड्राइव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राहुल शेवाळे, आमदार दिवाकर रावते, सुनिल शिंदे, आशिष शेलार, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा भवनचे भूमिपूजन आणि फलकाचे अनावरण करण्यात आले.

प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी. एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसे असावे हे इथं येऊन कळावे. हे भवन केवळ मराठी भाषा भवन नसून ते आपल्या मातृभाषेचे मंदीर आहे. इंग्रजांच्या राजवटीत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा अग्रलेख लिहून इंग्रजाना लोकमान्य टिळकांनी मराठीतूनच जाब विचारला होता. मराठी भाषेचे महत्व यावरुन अधोरेखित होते. रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रहही मुख्यंमंत्री ठाकरे यांनी यावेळे  व्यक्त केला.

कर्नाटकातील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाही 

आम्ही मराठी मराठी करतो पण आमची मूल इंग्रजी शाळेत शिकली त्यामुळे अनेकांनी टीका केली. इतर भाषा शिकणे, बोलणे याचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, सहन करणार नाही. छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचे तेज तळपले पाहिजे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading