एमईएस इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार; एसके डॉमिनेटर्स संघाचा तिसरा विजय

तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघाने आपले अपराजत्व कायम ठेवत सलग चौथा विजय मिळवला. एसके डॉमिनेटर्स संघाने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविला.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात महेश वाघिरे याच्या अचूक गोलंदाजीमुळे एसके डॉमिनेटर्स संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १० गडी राखून पराभव केला. केवळ दीड तासात झालेल्या सामन्यात दोन्ही डाव मिळून १८ षटकांतच खेळ संपला. कारण पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २३ धावांवर गुंडाळला गेला. ही या स्पर्धेची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. एसके डॉमिनेटर्सच्या महेश वाघिरे (३-९), राकेश मते (३-५) आणि कुणाल सुर्वे (२-५) यांच्या गोलंदाजीपुढे गॅरी कर्स्टन संघाचा डाव २३ धावांवर आटोपला. एसके डॉमिनेटर्स संघाने ३.५ षटकात २९ धावा करून सहज विजय नोंदविला.

ओंकार आखाडे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा २१ धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस इलेव्हन संघाने १७७ धावांचे आव्हान उभे केले. तर माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा डाव १५६ धावांवर आटोपला. एमईएस संघाच्या ओंकार आखाडे (४-२२) आणि शुभम हरपाळे (२-२३) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः
१) गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १३.४ षटकात १० गडी बाद २३ धावा (सार्थक चाकुरकर ५, महेश वाघिरे ३-९, राकेश मते ३-५, कुणाल सुर्वे २-५) पराभूत वि. एसके डॉमिनेटर्सः ३.५ षटकात बिनबाद २९ धावा (अक्षय पंचारीया नाबाद १९, शुभम खटाळे ९); सामनावीरः महेश वाघिरे;

२) एमईएस इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १७७ धावा (हर्ष संघवी ४४, सागर बिरवडे २९, शिवम पटेल ३-२९) वि.वि. माणिकचंद ऑक्सिरीचः १८.५ षटकात १० गडी बाद १५६ धावा (पलाश कोंढारे ३८, ओंकार खाटपे २८, धीरज मंत्री २४, दिलीप मालविया २३, ओंकार आखाडे ४-२२, शुभम हरपाळे २-२३); सामनावीरः ओंकार आखाडे;

Leave a Reply

%d bloggers like this: