Friday, June 5, 2026
BusinessLatest News

लिंक ग्रुप तर्फे पुण्यातील  हिंजवडी येथे क्षमता केंद्र सुरु करण्याची घोषणा

पुणे : जागितिक पातळीवरील लाखो लोकांना त्यांच्या आर्थिक मालमत्तेशी  जोडत डिजिटली तंत्रज्ञानआधारित व्यवसाय सक्षम करणाऱ्या  लिंक ग्रुपने  पुण्यातील हिंजवडी येथे भारतातील दुसरे क्षमता केंद्र सुरु करण्याची घोषणा केली आहे  हिंजवडीतील टेक झोन येथे हे केंद्र सुरु होणार आहे तसेच कंपनीतर्फे पुण्याच्या बाजारपेठेतून वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञानामध्ये सुमारे ४०० व्यक्तींची नियुक्ती  करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

लिंक ग्रुप हि जागतिक स्तरावरील कंपनी असून  कंपनीद्वारे जगातील काही बड्या कॉर्पोरेशन, पेन्शन फंड आणि वित्तीय संस्था, इक्विटी, पेन्शन, सेवानिवृत्ती, मालमत्ता आणि इतर आर्थिक मालमत्तांसह ग्राहकांच्या विविध पोर्टफोलिओसह भागीदारी केलीजाते. लिंक ग्रुपचे जगभरात ७००० हुन अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

पुणे हे  मुंबई नंतर भारतातील दुसरे केंद्र असून  २०१९ च्या सहामाहीत  कामकाजाची सुरुवात केली आणि १००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची टीम आहे. वाढत्या व्यावसायिकांच्या मागणीनुसार लिंक ग्रुपने आपल्या ग्राहकांच्या गरजा  ओळखून उत्कृष्ट दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी पुण्याला एक आदर्श बाजारपेठ म्हणून  पाहण्याचा दृष्टिकोन आहे . लिंक ग्रुप च्या विस्तारामार्फत नवीन पदवीधर आणि अनुभवी व्यक्तींना जागतिक करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे .

लॉन्च प्रसंगी बोलताना  हेड ऑफ इंडिया ऑपरेशन्स ऋषी धुपेर म्हणाले कि आम्हाला पुण्यात आमचे ऑपरेशन  सुरु करण्याबाबत आनंद होत आहे. पुणे शहर विकसित शहर आहे , पुणे शहराची ख्याती हि जगभरात पसरलेली आहे . पायाभूत सुविधा, चांगले हवामान , अनुकूल हवामान , गुणवत्तापूर्वक राहणीमान ह्या घटकांमुळे जागतिक दर्जाचे ब्रँड , कंपन्या आपल्या विस्तारासाठी पुण्याकडे आकर्षित होत आहेत.

ते पुढे म्हणाले कि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जागतिक आर्थिक उद्योगात करिअर घडवण्याची संधी प्रदान करत आहोत. कौशल्यातून आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली  सेवा पुरवण्यास वचनबद्ध आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading