Tuesday, October 6, 2026
Latest NewsPUNE

शिवसेनेची एक-एक महिला हजारो संपर्क बनवण्यासाठी सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : शिवसेनेच्या महिला आघाडीत संख्याबळ किती आहे यापेक्षा जनहिताच्या आणि संघटनेशी एकनिष्ठ महिला सैनिक किती आहेत यावर लक्ष पक्षाकडून नेहमी असते. शिवसेनेची एक एक महिला किमान हजार संपर्क निर्माण करू शकते एवढा विश्वास मला आहे. त्यामुळे कॉन्टेटी पेक्षा कॉलेटीवर काम करा असा सल्ला महाराष्ट्र राज्य विधानपरिषेदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.

शिवसेना महिला संवाद कार्यक्रमा अंतर्गत शिवसेना उपनेत्या व महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील युवती व महिलांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वडगाव बुद्रुक येथे झालेल्या संवाद कार्यक्रमाला महिला व महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

महिला वर्गाला मार्गदर्शन करून त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर व अडीअडचणीवर प्रकाश टाकला. सरकार व प्रशासनाच्या दृष्टीने तसेच शिवसेनेच्यावतीने याप्रश्नी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. या प्रसंगी त्यांच्यासोबत सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे हे देखल उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्योजक महिलांसाठी विविध योजना आहेत, या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा. महिलांनी उद्योग- व्यवसायातही गुणात्मक वाढ करून यशस्वी उद्योजक ह्वावे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील संवाद मेळाव्यांचे आयोजन या संवाद मेळाव्यांचे आयोजन कल्पना थोरवे व पुजा रावेतकर यांनी केले होते. यावेळी आदित्य शिरोडकर, संजय मोरे, गजानन थरकूडे यांनी देखील संवाद सभेला संबोधीत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading