Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महा विकास आघाडी सरकारच्या वाईट प्रवृत्तीची होळी – चंद्रकांत पाटील 

पुणे : सगळ्या वाईट प्रवृत्ती जाळण्याच प्रतीक म्हणजे होळी आहे. हे सरकार सामान्य माणसावर अन्याय करत आहे. या सरकारला आमदाराचा निधी वाढवण्यासाठी, त्यांच्या ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. एस टी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत महा विकास आघाडी सरकारने केलेल्या वाईट प्रवृत्तीची होळी आज आम्ही केली असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  या सांगितले.

पुण्यातील भाजप कार्यालय इथे ही होळी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. काश्मीर फाईल पिक्चर वरून महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, काश्मीर फाईलसमध्ये दाखवलेली परिस्थिती जे भयाण चित्र दाखवल ते वस्तुस्थिती नाहीय का? हे एकदा मान्य करा. काश्मीर मधला हिंदू माणूस पळून नाही का गेला? काश्मीर मधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का? तिथल्या पंडितांच्या प्रॉपर्टी हडप नाही केल्या का?असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading