Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३३ व्या बलिदान दिनी, मृत्युंजय दिनी त्यांना रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग ९ वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ मॉंसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणा-या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोल-ताशा पथकांनी, क्रीडा संघटनांनी व गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

म्हात्रे पूलाजवळील सृष्टी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेश सूर्यवंशी, रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, संजय पासलकर, शंकर कडू, प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, मंगेश शिळीमकर, सागर पवार, प्रवीणभय्या गायकवाड तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, ओमराजे पासलकर, विक्रांत मोहिते, किरण कंक, राजेश जोगदंड, सुनील जोगदंड, किरण शितोळे, महेश शिर्के, मयुर दळवी, दानिश साचे, जयश्री पृथ्वीराज पताळे, प्रांजल प्रकाश ढमढेरे तसेच सुवर्णा व सचिन पायगुडे, प्रिया व निलेश जेधे, प्रियांका व मोहन पासलकर, मोनिका व संतोष पासलकर यांनी सपत्निक रक्तदान करुन केली. आनंद ऋषीजी आणि लोकमान्य रक्त केंद्र या रक्तपेढ्यांनी रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन, मृत्युंजय दिन ११ मार्च हा दिवस मृत्युंजय रक्तदान दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला, स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, मायभूमीच रक्षण करण्यासाठी, तुमचे आमचे रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्तान फेडूयात रक्ताच रक्ताशी नात जोडूयात ही जाणीव जपत आम्ही सलग ९ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading