कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही: अजित पवार

पुणे:आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारत विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील उदघाट्नच्या कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. यावेळी कात्रज मेट्रोसाठी राज्य सरकारकडून पूर्ण प्रयत्न करणार येतील कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. मात्र, केंद्राने सुद्धा प्रयत्न करायला हवेत.म्हणजे कात्रज मेट्रो लवकर होईल असे पवार म्हणाले.

नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नातून कात्रज डेअरी ते वंडरसिटी सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ पथ या २५ वर्षे प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांच्यामुळेच हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगत रस्त्यासह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण आणि ४५ लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होत असल्याचे सांगितले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, नगरसेवक विशाल तांबे, प्रकाश कदम, नगरसेविका अमृता बाबर, स्मिता कोंढरे, आप्पा रेणूसे नानासाहेब बेलदरे आदीसह नागरिक उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, अनेक दिवसानंतर मी या परिसरात आलो आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या रस्त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवराज बेलदरे आणि सर्वांचे अभिनंदन! कात्रज दूध उत्पादक संघाच्या सहकाऱ्यांसोबत बोलून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. ज्यावेळी ही जागा डेअरीला दिली. त्यावेळी नागरीकरण कमी होते आता वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते.

लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कररुपी पैशांचा वापर व्यवस्थित करून अशी दर्जेदार कामे करायला हवीत. आपला परिसर स्वच्छ ठेवा कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा. केवळ महापालिका, केंद्र सरकार, राज्य सरकार काही करू शकत नाही. लोकांचेही सहाय्य हवे. असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले, कृपा करून स्वतः कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावा. उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहनही यावेळी पवार यांनी यावेळी केले. त्याचवेळी कात्रजला आणखी कशा पायाभूत सुविधा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच वाढत्या नागरिकिकरणाच्या पार्श्वभूमीवर पाणी, रस्ते, वीज, उद्याने क्रीडांगणे, स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधांवर काम करण्यात येईल. या सुविधा देण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: