पुणे महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
पुणे : पुणे महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा सौ. केतकी कुलकर्णी, माजी उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, नगरसेविका सौ स्मिता वस्ते, नगरसेविका प्रिया गदादे पाटील मोर्चा अध्यक्षा,सौ विनया बहुलीकर, आशाताई देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर पाहुण्यांचा परिचय करून. देण्यात आला, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी भाषणात सांगितले पुणे महिला मंडळ शतकाकडे वाटचाल करीत आहे, अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी जागतिक महिला दिनाच्या महत्व सांगितले नगरसेविका स्मिता वस्ते म्हणाल्या महिलांना संधी मिळाली तर त्या प्रगती करू शकतात त्यासाठी त्यांना सर्वांचे पाठबळ मिळाले पाहिजे.
विनया बहुलीकर म्हणाल्या महिलांनी स्वतः चे अस्तित्व निर्माण केले आहे चौकट तोडून नवीन प्रगतीचे स्वप्न बघत वाटचाल करीत आहे बदल घडत आहे. प्रियांका शिंदे शेंडगे म्हणाल्या सर्व एकत्र येऊन भारतीय सीमेवर जाऊन तेथील महिलांना आपण कसे सामावून घेऊन काम करणार हे सांगितले
आशाताई देशपांडे यांनी उद्योजकता यामध्ये महिला कौशल्य विकास योजना लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी सांगितले मंदार रेडे म्हणाले यापू सर्व समाज तुमच्या बरोबर आहे यापुढे यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष उभा राहिल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले
यानंतर स्ंस्थेतील छायाताई उंडाळे, कोंडा मावशी आणि साळूंके मावशी यांचा सन्मान करण्यात आला पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या “ती ची अभिव्यक्ती ह्या संकल्पनेतूनस्त्रीच्या बालपणापासून मुलगी,बाई, आणि आई व्यक्तीरेखा हा कार्यक्रम. ह्या महिलांनी सादर केला. कार्यक्रमात आर्या जोशी, सानिका खरे, स्वाती केळकर , छाया पुराणिक आणि कलाकार यांचा सहभाग होता. परिचय वैशाली देशमुख यांनी केला, पुष्पा कोळपे यांनी सुत्र संचालन केले आणि प्रीती मानकर यांनी आभार मानले
